केंद्र सरकारचा मोठा व महत्वाचा निर्णय :1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार
नवी दिल्ली : करोना विरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढाईच्यादृष्टीन केंद्र सरकारे आज एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस दिल्या जाणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. देशात करोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे. सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयात एका डोससाठी २५० रुपये आकारले जात आहेत..आतापर्यंत 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती. देशभरातील 12.38 को. देशभराटी लोकांनी कोरोनाचा पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे. . मात्र करोनाचा वाढता फैलाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. करोना फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, व्हॅक्सीन तयार करणाऱ्या कंपन्या आपला 50% पुरवठा केंद्राला करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तर, इतर 50% पुरवठा राज्य सरकारांना किंवा ओपन मार्केटमध्ये देता येईल. लसीकरणासाठी कोविनद्वारे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
कंपन्या 50 टक्के लस केंद्राला देणार
सरकारने व्हॅक्सीन तयार करणाऱ्या कंपन्यांना सांगितले आहे की, फेज-3 मध्ये कंपन्या महिन्याला तयार होणाऱ्या 50% केंद्राला देतील. उर्वरित 50% लसीचा साठा राज्य सरकार आणि ओपन मार्केटमध्ये विकू शकतात.
केंद्र क्रायटेरिया ठरवून राज्यांना लस देणार
केंद्र सरकार लसीच्या आपल्या 50% कोट्यातून क्रायटेरिया ठरवेल आणि त्यानुसार, सर्वात प्रभावित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लस सप्लाय करेल. व्हॅक्सीनच्या वेस्टेजवर राज्यांची निगेटीव्ह मार्किंगदेखील केली जाईल.
पहिला डोज घेणाऱ्यांना प्राथमिकता
व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सना व्हॅक्सीनेशमध्ये प्राथमिकता दिली जाईल. व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना प्राथमिकता दिली जाईल. यासाठी संपूर्ण आराखडा तयार केला जाईल.
दरम्यान, आज (सोमवार) पंतप्रधानांची काही औषध कंपन्यांसोबत देखील बैठक झाली आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत. स्पुटनिक व्हीला सुद्धा आपात्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहीमेला येत्या दिवसात वेग येणार असल्याचे दिसत आहे.
लसीकरण गतिमान करण्याची गरज
.करोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेले आहे. त्यात त्यांनी करोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच लसपुरवठय़ास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावीत, अशी सूचनाही मनमोहन यांनी केली आहे.
देशात ९२ दिवसांत १२ कोटी नागरिकांचे लसीकरण
देशात गेल्या ९२ दिवसांत १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असून वेगाने लसीकरण करणाऱ्या देशात भारत समाविष्ट आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेत ९७ दिवसांत हा टप्पा गाठला गेला होता, तर चीनमध्ये १०८ दिवसांत तो गाठला गेला
Govt of India announces liberalised & accelerated Phase 3 strategy of COVID-19 vaccination from May 1; everyone above the age of 18 to be eligible to get vaccine pic.twitter.com/7G3WbgTDy8
— ANI (@ANI) April 19, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 19, 2021, 8:32 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY