पळून जायला मी काही विजय मल्या, नीरव मोदी किंवा मेहूल चोक्सी नाही :प्रताप सरनाईक
मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा आघाडी सरकारविरुद्धची खदखद बोलून दाखवली. माझ्यावर संकट आले तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी उभे राहिले नाहीत, त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना ‘ते’ पत्र लिहिले, असे प्रताप सरनाईक (Pratap Sirnaik) म्हणालेत. यानंतर, सरनाईक हे आघाडी सरकारवर नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
दरम्यान, शिवसेना नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) याना सरनाईक यांनी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रात सरनाईक यांनी शिवसेनेने भाजपाशी पुन्हा जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. त्या पत्रामुळे काही काळ राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.,. पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे स्वतःच्या मुद्द्यावर आजही ठाम आहेत. आपल्यावरच्या संकटकाळात महाविकास आघाडीचे नेते पाठीशी उभे राहिले नाहीत, अशी खंत सरनाईकांनी विधिमंडळ परिसरात बोलून दाखविली आहे. प्रताप सरनाईक म्हणाले, की “ED Case चा माझ्या कुटुंबावर घाला घातला जात असताना किंवा आरोप केले जात असताना माझ्या मनात एकच विचार येत होता की, आपण महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांना उत्तर दिली.
ED Case मध्ये चौकशी आणि तपासापासून पळून जायला मी काही विजय मल्या, नीरव मोदी किंवा मेहूल चोक्सी नाही, अशी टिपण्णी देखील प्रताप सरनाईक यांनी केली. महाविकास आघाडीची स्थापना कंगना प्रकरण, अर्णव गोस्वामी प्रकरण यावेळी मी महाविकास आघाडीची बाजू आक्रमकपणे मांडली. मी प्रवक्ता होतो. ते माझे काम होते. पण म्हणूनच भाजपचा माझ्यावर राग होता, असा दावाही प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 5, 2021, 5:18 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY