अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटूंबाला कोरोनाची लागण , सोशल मीडियावर केले भावनिक आवाहन
कोरोनाने आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सला आपल्या जाळ्यात ओढले असून आता तर कोरोना त्यांच्या पूर्ण कुटूंबाला आपल्या जाळ्यात ओढू लागलाय. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्या पती, मुलांसह तिच्या सासू-सास-यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. सुदैवाने शिल्पाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र मुलगी समीशा (Samisha), पती राज कुंद्रा (Raj Kundra), मुलगा वियान (Viaan) आणि तिच्या सासू-सास-यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तसेच तिच्या घरातील 2 कर्मचा-यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने गेल्या 10 दिवसांपासून त्यांचे घर कोरोनाच्या सावटाखाली आहे. शिल्पाने सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
शिल्पाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘मागील १० दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझे सासू- सासरे करोना पॉझिटिव्ह झाले. त्यानंतर माझी मुलगी समीशा मग मुलगा विवान यांनाही करोनाची लागण झाली. त्यानंतर माझी आई आणि आता राज. हे सगळे करोना निर्बंधानुसार वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आयसोलेट आहेत. आम्ही डॉक्टरांचा प्रत्येक सल्ला मानून औषधोपचार करतो आहोत. हे सगळं इतक्यावरच थांबलं नाहीए तर आमच्या घरातील दोन कर्मचाऱ्यांनाही करोना झाला आहे आणि त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.’
स्वतःची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं सांगत शिल्पाने लिहिलं, ‘देवाच्या कृपेने सगळे लवकर बरे होत आहेत. माझी चाचणी निगेटिव्ह आली आहे. सगळ्या निर्बंधांचं पालन केलं जात आहे. महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीसाठी मी त्यांचे आभार मानते. तुमच्यामुळे हे सगळं निभावून नेऊ शकले. माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करा.’ सोबतच शिल्पाने सगळ्यांना मास्क वापरण्याचं भावनिक आवाहन केलं आहे .
शिल्पाने लिहिलं, ‘तुम्ही करोना पॉझिटिव्ह नसाल तरीही तुम्ही मास्कचा वापर करा. हात सॅनिटाइज करत राहा आणि सुरक्षित राहा. सगळ्यात महत्वाचं सकारात्मक विचार करा.’ यापूर्वीही अनेक बॉलिवूड कलाकरांना करोनाची लागण झाली आहे. नुकतीच अभिनेत्री दीपिका पादुकोणसह संपूर्ण कुटुंबालादेखील करोनाची लागण झाली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 7, 2021, 7:09 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY