राज्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : देशभरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. तसंच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. . मात्र राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
“राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही. सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करणार नाही,” असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षा नावाची टांगती तलवार लटकलेली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर बारावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. कोरोनास्थिती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 14, 2021, 7:37 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY