Maratha Reservation :..”या” सरकारला लाथा मारल्याशिवाय जाग येणार नाही,! विनायक मेटे
बीड :सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा सुरू झाला आहे. बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आमदार विनायक मेटे यांनी जय्यत तयारी केली . आज शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मेटे यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर निशाणा साधला . मराठ्यांना वाऱ्यावर सोडू नका, असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे (Shivsangram Sanghatna) प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिला असून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
आज शनिवारी (ता.पाच) बीड (Beed) येथे मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला., की ही लढाई गरीब, श्रीमंतांची नाही. ही लढाई ना गड वाल्यांची आहे ना किल्यावालाची , वाड्या वाल्यांची तर अजिबातच नाही आणि माडी वाल्यांचा तर संबंधच नाही अशी जहरी टीका विनायक मेटे यांनी केली . मराठा समाजाला EWS (आर्थिक दुर्बल घटक) आरक्षणाचा निर्णयही आपण मराठा मोर्चा जाहीर केल्यावर घेतला गेला. त्यासाठी मी कोर्टात गेल्यानंतर सरकारने आपल्याला EWS आरक्षण दिले . त्यामुळे या सरकारला लाथा मारल्याशिवाय जाग येणार नाही. अन्यथा ते जागे होणार नाही. भविष्यातील मोर्चांवर बोलताना ते म्हणाले, जोपर्यंत आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही, तोपर्यंत संघर्ष चालू राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
येत्या पाच जुलैपर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीतर पावसाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा मेटेंनी सरकारला दिला. मराठा आमदारांनी (Maratha Community) सरकारकडून मागण्या मान्य करुन घ्यावे, अशी विनंती त्यांनी लोकप्रतिनिधींना केली. राज्यातील या सरकारला कोणत्याही समाजाशी देणे-घेणे नाही. सरकारला चले जाओ असे म्हणण्याची वेळ आणू नका उद्धवजी, असे आवाहन श्री.मेटेंनी केली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 5, 2021, 5:23 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY