Breaking News

तसंच 500 हून अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांनी कोविड सेंटर उभारावे: आपत्ती व्यवस्थापन

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 7, 2021 3:35 pm
|

Break The Chain संदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राज्यातील कठोर निर्बंधांच्या कालावधीत चिकन, मटणची दुकाने, मासेविक्री सुरु राहणार आहेत. शेतकऱ्यांसाठी बियाणं, खतं, किटकनाशकं यांची दुकाने देखील सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच 500 हून अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांनी कोविड सेंटर उभारावे, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान मुंबई मध्ये दिवसागणिक 10 हजारांच्या वर नवे कोरोना रूग्ण आढळत असल्याने मुंबापुरी पुन्हा चिंतेमध्ये आहे. सरकार कडून कोविड 19 नियमावलीचं पालन करण्यासोबतच कोविड 19 च्या संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. पण आता मुंबई मध्ये कोविड 19 लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याचं चित्र असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. दरम्यान काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लस पुरवठा करण्याबाबात केंद्राशी बोलणी सुरू असल्याचं म्हटलं आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 7, 2021, 3:35 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *