Breaking News

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकून शासकीय कामात हस्तक्षेप केला; दिलीप वळसे-पाटलांनी दिले कारवाईचे संकेत

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 18, 2021 8:20 pm
|

मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत., दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन शनिवार दुपारपासून केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरू आहे. या लढाईचा एक भाग पार्ले येथील पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री रंगला. ब्रुक फर्मा(Bruck Pharma) कंपनीकडे रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर विले पार्ले पोलिसांनी ब्रुक फार्माचे संचालक राजेश डोकानिया यांना दहा पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारत खरडपट्टी काढली. भाजपचे नेते यावरुन आता फडणवीसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप लावला आहे. आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आज ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे ते म्हणाले.

वळसे पाटील पुढे म्हणाले की, राज्यात 50 हजार रेमडेसिवीरचा साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचे पत्रं असल्याची माहीती पोलिसांना नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले होते. पण, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांवर दबाव टाकला. शासकीय कामात हस्तक्षेप यापूढे सहन केल्या जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला आहे.यावेळी वळसे पाटलांनी म्हटले की, हा साठा सरकारला देण्यात येणार नव्हता. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुकच्या मालकाला केली होती. त्यावर त्याने असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे हा साठा कुणाकडे जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल. हा साठा पोलिसांनी जप्त केलेला नाही. हा साठ कंपनीकडेच असून त्याचा वेगळा वापर करणार आहेत की नाही याची चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 18, 2021, 8:20 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *