Breaking News

राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते पण “या “अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? सचिन सावंत यांचा भाजपवर टीकास्त्र

'महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 25, 2021 3:51 pm
|

मुंबई : मराठा आरक्षण मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपवर काँग्रेसने जोरदार निशाणा साधलाय . काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावत म्हटले आहे की, प्रियांका चोप्रा आणि कंगना राणौत या बॉलिवूड तारकांना पंतप्रधान मोदी भेट देतात. मात्र, अनेकदा विनंती करूनही संभाजीराजे छत्रपती यांना मोदींनी भेट दिली नाही. हा महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे, सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली आहे.नरेंद्र मोदी आणि भाजपला छत्रपतींची आठवण केवळ निवडणुकीच्या वेळीच येते का, असा संतप्त सवालही सचिन सावंत यांनी विचारला.

पुढच्या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, ”महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे.” असे खड्डेबोल सुनावले आहेत.

सचिन सावंत यांनी या आधीही चंद्रकांत पाटील आणि भाजपवर मराठा आरक्षणावरुन जोरदार हल्ला बोल केला होता. सचिन सावंत यांनी कालच (24 मे) केलेल्या ट्विटमध्य म्हटले होते की, मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत 1) मोदींची विषयांची समज फार कमी आहे. 2) मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. 3) छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त करताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत चार वेळा वेळ मागीतली. चार पत्रं दिली. परंतू, पंतप्रधान मोदी यांनी यांनी एकदाही वेळ दिली नाही. संभाजीराजे छत्रपती यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, मराठा आरक्षणविषयी भारतीय जनता पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करतणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते की, मराठा आरक्षण हा विषय राज्याचा आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात थेट भेट होऊ शकली नाही.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 25, 2021, 3:51 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *