Breaking News

केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर; रुपाली चाकणकरांचे ट्विट

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 24, 2021 7:23 pm
|

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील ही अत्यंत मोठी घडामोड आहे. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. सीबीआयने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट केले आहे. लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत, असे चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे

नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरती एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ‘लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत’. असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले हो असताना सीबीआय त्याचा उपयोग धाड घालण्यासाठी करत आहे. असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 24, 2021, 7:23 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *