मोठी बातमी,: राज्यातील कोरोनामुक्त गावात 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु होणार;ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी
मुंबई: कोविड-19 ची दुसरी लाट (Covid-19 Second Wave) ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध देखील हळूहळू शिथील होत आहेत. यातच आता शाळा-कॉलेज संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना टप्प्याटप्पयाने शाळेत बोलवण्यात येणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग या कोरोना त्रिसुत्री बरोबरच विद्यार्थ्यांनी इतर नियम देखील पाळणे आवश्यक आहे. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसता येणार आहे. तसंच दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. अशाप्रकारे एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी बसू शकतील. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये लक्षणे आढळल्यास त्याला घरी पाठवण्यात येतील. त्यानंतर लगेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल.शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी त्याच गावात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिक्षकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी लागू नये, यासाठी काळजी घेण्यात येणार आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 5, 2021, 9:08 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY