कोरोनाचा कहर, ‘या’ शहरात 22 कोरोना बाधितांवर एकाचवेळी अग्नी तर काल एकूण ४२ अत्यंसंस्कार
अहमदनगर : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे. यातच अहमदनगर येथील अमरधाममध्ये हृदय पिळवटून टाकणारे चित्र समोर आलं असून अमरधाम मध्ये सरणावर एकाचवेळी 22 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत . विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर दिवसभरात एकूण तब्बल 42 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच समोर आले आहे. .
दोन दिवसांपूर्वी बीड ( Beed) जिल्ह्यात आंबेजोगाई येथे एकाचवेळी 8 जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यानंतर आता एकाच वेळी २२ जणांवर अत्यंसंस्कार होत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये (Ahmednagar Corona News) समोर आला आहे. अहमदनगरच्या अमरधाममध्ये (Amar Dham) एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार (22 Corona Patient Funeral) करावे लागले आहेत. तर, याच ठिकाणी दिवसभरात एकूण 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बधितांबरोबर मृतांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 9, 2021, 2:07 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY