Breaking News

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 66,191 कोरोनाचे नवे रुग्ण तर 832 रुग्णांचा मृत्यू

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 26, 2021 12:25 pm
|

मुंबईः राज्यात २४ तासांत ६६ हजार १९१ नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ६१ हजार ४५० जण २४ तासांत बरे झाले. राज्यात २४ तासांत कोरोनामुळे ८३२ मृत्यू झाले. 66 thousand 191 new covid19 cases in maharashtra

आतापर्यंत महाराष्ट्रात ४२ लाख ९५ हजार २७ कोरोनाबाधीत आढळले. यापैकी ३५ लाख ३० हजार ६० जण बरे झाले. राज्यात कोरोनामुळे ६४ हजार ७६० मृत्यू झाले. कोरोना झालेल्यांपैकी १ हजार ८५३ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या ६ लाख ९८ हजार ३५४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आतापर्यंत २ कोटी ५७ लाख ४९ हजार ५४३ कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ४२ लाख ९५ हजार २७ पॉझिटिव्ह आढळल्या. राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १६.६८ टक्के आहे. राज्याचा कोरोना मृत्यू दर १.५१ टक्के आणि कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८२.१९ टक्के आहे. राज्यात ४२ लाख ३६ हजार ८२५ जण होमक्वारंटाइन आणि २९ हजार ९६६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 26, 2021, 12:25 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *