Breaking News

…तेव्हाच कोरोनाला हद्दपार करता येईल (ब्लॉग )

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 24, 2021 3:32 pm
नागपूर | अंकुश शिंगाडे

कोरोना आज घराघरात शिरलेला आहे. असं वाटत आहे की हा कोरोना वसुंधरेवरील भार कमी करायला निघालाय की काय? वसुंधरा नाराज झालेली दिसत आहे. वसुंधरेवर पाप वाढल्याचं दिसत आहे. कोरोनाच्या कार्यकालाचा विचार करतांना असं आढळत आहे की एखादा मरतुकडा व्यक्ती हा जीवंत दिसत आहे व कोणी धिप्पाड देहाचा असेल तर त्याला कोरोना हा लुळापांगळा करीत आहे. त्यातच कोरोना हा विदर्भात पाय पसरत आहेत. आज कोरोनापुढं सामान्य माणसांनी हार झालेली असून आज या कोरोनानं सरकारला जाग आलेली आहे. त्यातच सरकार हे मदत करीत असल्याचे जाणवते. पण सरकारला लोकं सहकार्य करीत नसल्याचे जाणवते.

कोरोनावर केवळ राजकारण सुरु असलेलं दिसतं. मी हे केलं, मी ते केलं म्हणत प्रत्येकाचे काम केवळ श्रेय लाटण्याचं असून प्रत्येकजण आपली स्वतःचीच पाठ थोपटत असलेले दिसतात. जी कामं नगरसेवकानं करायचे असतात. ती कामं शहरी भागात नगरसेवक न करता आम जनताच आजच्या या कोरोना परीस्थीतीत मदतीसाठी पुढे येत असल्यासारखी दिसत आहेत. स्थानिक स्तरावर अशीच परिस्थीती आज दिसत असून यात नगरसेवकाचे दुर्लक् झाल्याचंही जाणवतं. तसंच गावखेड्यातून सरपंच ग्रामसेवकांनी आपलं काम बरोबर न केल्यानं आज कोरोना वाढत असलेला दिसत आहे. आज स्थानिक स्तरावर अशीच परिस्थीती असल्यानं आज प्रत्येकांना कोरोना संकटाकडे जावं लागत आहे.कोरोनाच्या पाश्वभुमीवर असं मत मांडतांना काही लोकांना असं वाटू शकते की यात सरपंच, नगरसेवकाचं काय चुकलं. महत्वाचं म्हणजे पुर्ण गाव हा सरपंच व ग्रामसेवकावर आधारीत असून शहरी भागात नगरसेवकावर आधारीत आहे. त्यातच दर पंधरा दिवसानं प्रत्येक विभाग सानिटायझर केल्या गेला तर हा व्हायरस वस्तीवस्तीत गावागावात टिकणार नाही वा त्याचे प्रमाण कमी होईल. त्यातच रुग्णसंख्याही कमी होईल. पण आजकाल निवडून येणारे हे प्रतिनिधी अशा कामाला शुल्लक काम समजून अशा गोष्टीकडं दुर्लक्ष करतात. त्यामुळं कोरोना वाढणार नाही तर काय?

पुर्वी गावागावात पावसाळ्यात एक पावडरची फवारणी केली जायची. त्या फवारणीचा उद्देश होता की गावात पावसाळ्यात पाणी गोळा असल्यास त्या पाण्यात वाढणा-या परजीवांपासून कोणत्याही प्रकारचे रोग गावात होवू नये. त्यातच साथी येवू नये. तसेच हिवताप व मलेरियाच्याही गोळ्या वाटल्या जायच्या. त्यामुळं नक्कीच हिवताप वा साथीचे रोग येणे बंद झाले होते. त्यातच अशाच प्रकारे दरवर्षी पोलिओ लसही लहान बाळांना पाजण्यात येते. त्यानुसार पोलिओही बंद झाला आहे. हेच तत्व इतरही रोगाबाबत घडलं. त्यामुळं त्या साथी आता कालबाह्य झाल्या आहेत. मात्र अलिकडल्या काही वर्षाच्या काळात ना अशी पावसाळ्यात फवारणी केली जात. ना निर्बंध पाळले जात. कधी नगरसेवक आपल्या वस्तीत फेरफटका मारत ना कधी गावस्तरावर सरपंच. ते फक्त जिथं राहतात, तेथीलच भागाचा विकास करीत असतात. बरेचसे नगरसेवक तर असे असतात की जे दुस-या भागातून स्थलांतरीत झालेले असतात. ते तर थोपविण्यात आलेले असतात. त्यांना ते ज्या भागातून निवडून आले, त्या भागाबद्दल काहीच सोयरसुतक नसतं. सरपंच उपसरपंचाबाबतही तेच होतं. ज्यावेळी गटग्रामपंचायत असते. त्या गटग्रामपंचायतीबाबत सरपंच एका गावचा तर उपसरपंच दुस-या गावाचा. मग ताळमेळ जुळत नाही. त्यातच फवारणी होत नाही. स्थानिक स्तरावर असलेले नगरसेवक व सरपंच ग्रामसेवक हे जेवढे तत्पर असतील, तेवढेच साथीचे रोग तत्पर नसतात. ते जोर करीत नाही वा नागासारखे मुंडके वर काढत नाही. जर त्यांनी व्यवस्थीत काळजी घेवून गावाला योग्य सोयी पुरवल्या तर. परंतू असे होत नाही. हे स्थानिक प्रशासन स्थानिक भागात फेरफटकाच मारत नाही. त्यातच मच्छर मारण्यासाठी फवारण्या करीत नाही. त्यातच वर्षातून एखाद्या वेळी धुळवडीची गाडी येते. ती गल्लीगल्लीत फिरत नाही. त्यातच डास मरत नाही. तसेच एवढी मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ असतांना स्थानीक स्तरावर दर पंधरा दिवसानं विभाग सानिटायझर होत नाही. सरकार आदेश काढत. सरकारला वाटतं की आपलं सरकार बदनाम होवू नये. पण स्थानिक पातळीवर हेव्यादाव्याचं व पक्षाचं राजकारण चालतं. हे विरोधी पक्षातील नेतेच सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र स्थानिक स्तरावर योजतात. हे नेतेच पक्षीय राजकारण खेळतात. मग कोरोना वाढणार नाही तर काय?

कोरोना ही जागतिक महामारी आहे. ती महामारी अशाच प्रकारच्या पक्षीय राजकारणाचा फायदा घेत डोके वर काढत आहे. कोरोनासारख्या या महाभयंकर आजारात असं पक्षीय राजकारण नको. सर्व स्थानिक स्तरावरील राजनीतीक पार्ट्यांनी आपले हेवेदावे दूर करुन एकत्र येण्याची गरज आहे. राजकारण करण्याची गरज नाही. तेव्हाच ख-या अर्थानं कोरोनाला दूर नाही तर हद्दपार नक्कीच करता येईल. ज्याप्रमाणे मतदानात गल्लीगल्लीतील प्रत्येक माणसांना बुथवर आणून मतदान केलं जातं. अगदी तसंच आज गल्लीगल्लीतील लोकांच्या घराघरात जावून त्याचं घर कोरोनाच्या पाश्वभुमीवर सानिटाईज करणं आवश्यक आहे. त्यांची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. त्यातच त्यांना औषध पुरवणंही आवश्यक आहे. जर असे केले नाही आणि घराघरात सानिटायझर फवारले नाही आणि रुग्णांची कोरोना तपासणी घरी जावून केली गेली नाही आणि जर विभागवार बुथ लावून जरी कोणाला तपासणी करायला या जरी म्हटलं तरी कोणी येणार नाही व कोरोना महामारी कधीच संपणार नाही. कारण सामान्य जनता एवढी घाबरली आहे की ती कोरोना तपासणी करुन घेवून दहशतीनं मरणं पसंत करीत नाही. ती जनता मरणं पसंत करतात, पण तपासणी करीत नाही. म्हणून कोरोनाच्या या पाश्वभुमीवर स्थानिक प्रशासनानं सक्रीय राहून हव्या त्या उपाययोजना कराव्यात पक्षीय राजकारण बाजूला सारुन व एकत्र येवून. जेणेकरुन कोरोना संपविता येवू शकेल. तसेच कोरोना स्थानिक स्तरावरुनच संपेल असेही म्हणता येईल.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 24, 2021, 3:32 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *