Breaking News

सीबीआयला सहकार्य केलं, आता कोव्हिड सेंटरला निघालोय : अनिल देशमुख

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 24, 2021 7:58 pm
|

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील ही अत्यंत मोठी घडामोड आहे. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. दरम्यान , अनिल देशमुख यांच्या विरोधात FIR दाखल केल्यानंतर तपासणीसाठी पोहचलेली CBI ची टीम निवासस्थातून नुकतीच बाहेर पडली आहे.

यानंतर लगेचच अनिल देशमुख यांनी ट्विटरवरती एक पोस्ट शेअर करून म्हटले आहे की,सीबीयची टीम माझ्या घरी आली होती. मी त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. सध्या कोरोना वाढला असून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

नेमकं काय प्रकरण

दरम्यान , सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले . मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी सीबीआयने देशमुख यांची 11 तास चौकशी केली होती. देशमुख यांच्या व्यतिरिक्त काही अज्ञात लोकांवर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयकडून काही ठिकाणी तपासणी सुद्धा करत आहे. सीबीआय ज्या ठिकाणी तपास करत आहे त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या घराचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. देशमुख यांच्यावर भ्रष्टाचारा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयासह दहा ठिकाणी सीबीआयची छापे छापेमारी , यावर नेत्याच्या प्रतिक्रिया

काय म्हणाले संजय राऊत ?

यावर संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर सीबीआयवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी एक ट्विट सुद्धा केले असून त्यात असे म्हटले आहे की, काहीतरी गडबड आहे. मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुख यांच्यावर धाडी,एफआयआर वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही आहे. त्यामुळे काहीतरी गडबड जरुर आहे.

नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरती एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ‘लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत’. असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले हो असताना सीबीआय त्याचा उपयोग धाड घालण्यासाठी करत आहे. असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

काय म्हणाले नवाब मलिक ?

तसेच नवाब मलिक यांनी सुद्धा सीबीआयवर निशाणा साधला आहे. त्यांनी सीबीआयला काही प्रश्न विचारले आहेत. त्यानुसार त्यांनी कोर्टात रिपोर्ट दाखल केला? कोर्टाने FIR दाखल करण्यास सांगितला का? या बद्दल कोणतीच माहिती नाही आहे. अनिल देशमुख यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. आज ठिकठिकाणी छापेमारी केली जात असल्याची बाब समोर येत आहे. तसेच अँटेलिया प्रकरणी सचिन वाझे कोणच्या सांगण्यावरुन काम करत होते ते अद्याप सांगण्यात आलेले नाही. अनिल देशमुख यांच्यासह सरकारला बदनाम करण्याचा हा कट आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी पोलीस बंदोबस्तात वाढ

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अनिल देशमुख हे सध्या नागपुरातच मुक्कामी आहेत. माजी पोलिस आयुक्त परमविर सिंह यांच्या आरोपांवर चौकशी करणार्‍या सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानासह राज्यातील 10 ठिकाणी छापे टाकले आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 24, 2021, 7:58 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *