डोंबवलीत कुत्र्याच्या पिल्लाने घाण केल्याने वाद विकोपाला, रहिवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
मुंबई : डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा परिसरातील साई इन्कलेव्ह सोसायटीमध्ये १४ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन शेजाऱ्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. इमारतीत राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्याने एका मजल्यावर घाण केली. दुसऱ्या महिलेने या मुद्द्यावर त्या महिलेशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेला . काही क्षणातच या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही फ्री स्टाईल हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. या व्हिडिओ मध्ये काही महिला एकमेकींना बेदम मारहाण करत आहेत तर पुरुषांमध्ये देखील हाणामारी होताना दिसत आहे .
सोसायटीमधील या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे . याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करत दोन्ही बाजूकडील एकूण १४ ते १५ जणांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला असून चार जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.
https://twitter.com/kaaltarangnews/status/1416000304525438977?s=19
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 16, 2021, 5:10 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY