कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत- संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : देशात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. बाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही वाढ झाली आहे. त्यातच काही ठिकाणी वाढत्या कोरोनाबाधितांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. कोरोनासमोर सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूदराची भीती वाढत आहे. असे असतानाच कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले , कोरोना व्हायरस (Coronavirus) नावाचा आजारच नाही. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मास्क (Mask) लावण्याचा सिद्धांत कोणत्या शाहण्याने काढला आहे. चावटपणा आहे सगळा. मूर्खपणा आहे, असे काहीसे अजब तर्कट मांडत संभाजी भीडे (Sambhaji Bhide) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. तसेच देशात कोरोनाच्या नावाखाली खेळखंडबोबा सुरु आहे. हा खेळखंडोबा देश आणि राज्य अशा दोन्ही पातळीवर सुरु आहे. याला केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे जबाबदार आहेत. ज्यांना जगायचे ते जगतील, ज्यांना मरायचे ते मरतील. हे राज्य छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांना आदर्श मानून केले जावे. नोटेवरचा गांधी डोळ्यासमोर ठेऊन जर कारभार केला तर कोरोना हा असाच वाढेल, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
कोरोनाचे कारण देऊन लॉकडाऊन लावला जात आहे. खरे म्हणजे लॉकडाऊन लावण्याची काहीही गरज नाही. लोकांचे पोट हातावर आहे. अशा लोकांचे नुकसान होत आहे. दारुची दुकाने उघडली जात आहेत. इतर गोष्टी बंद केल्या जात आहे. दारुच्या दुकानावर जाणाऱ्यांना पोलीस काही बोलत नाही. इतर वेळी मात्र काठी मारतात. ज्याला आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे तो घेईल. सरकारने यात अजिबाद लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शी कारभार घ्यावा. लॉकडाऊन लागू करु नये. एका बाजूला गांजा, मटका, दारु, मावा अफू सगळे सुरु आहे. दुसऱ्या बाजूला मात्र, तालमी, मैदाने बंद अशी स्थिती आहे. हा सगळा काय चावटपणा चालवला आहे? असेही भिडे यांनी म्हटले आहे. संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठानचे (Shivpratishthan ) संस्थापक आहेत. संभाजी भिडे यांनी या आधीही अशीच काही वादग्रस्त विधाने केली आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे हे नेहमी चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 8, 2021, 3:08 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY