पाकिस्तानला कोरोनाची लस मोफत दिली जाते, मग राज्याला 400 रुपये दराने का? काँग्रेसचा सवाल
पुणे : केंद्र सरकारला कोरोना लस 150 रुपयांना मिळते. मग राज्य सरकारला ती लस 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराने का दिली जाते? दुश्मन राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला कोरोनाची लस मोफत दिली जाते, मग राज्याला 400 रुपये दराने का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान, आज नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस शिष्टमंडळाने,पुण्यातील विभागीय आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील वाढती रुग्णसंख्या, लॉकडाऊन, कोरोनाचे निर्बंध यावर त्यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.तसेच , भारतातील वॅक्सीन उत्पादक कंपन्यांकडून होणारा व्यापार थांबवण्याबाबत तसेच देशामध्ये लसीकरण हे केंद्र सरकारने मोफत करावे या मागणीसाठी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.
केंद्र सरकारला कोरोना लसीचा एक डोस हा 150 रुपये दराने मिळतो. मात्र राज्य सरकारला कोरोना लसीच्या प्रति डोससाठी 400 रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये दर आकारला जातो. कोरोना काळात व्यापार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तसेच तुम्ही दुश्मन असलेल्या पाकिस्तानला फुकट लस दिल्या आहेत. मग राज्याला 400 रुपयाने का? असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मोफत कोरोनाची लस द्यावी, अशीही मागणी नाना पटोले यांनी केली.
केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देश अधोगतीला
आपल्या देशाच्या प्रमुखांनी योग्य नियोजन न केल्यामुळे आज लोकांना हकनाक जीव गमवावा लागतोय. मागच्या वर्षी नरेंद्र मोदींनी कोरोनाला राष्ट्रीय महामारी घोषित केलं होतं. त्यामुळे या महामारीचं नियोजन केंद्राने करायला हवं होतं. काँग्रेसच्या नेत्यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला विनंत्या केल्या मात्र त्यांची टिंगलटवाळी करण्याचं काम भाजपने केलं, जर वेळीच नियोजन केलं असतं तर ते लोकं आज आपल्यात असते अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
,सिरम कंपनीने लसीच्या किंमतीत जो भेद करत आहे. त्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. जर लॉकडाऊन जर नसता तर आम्ही आंदोलन केले असते. ज्या देशांमध्ये व्यापक लसीकरण झालं, ते देश कोरोनामुक्त झाले आणि तेथील लॉकडाऊन देखील संपला. मात्र नक्कीच लसीकरणात नफेखोरी आहे आणि ही नफेखोरी आता स्पष्ट होतेय. भाजप व्यापारी दृष्टिकोन ठेवून सरकार चालवत आहे. आधी ‘हम दो हमारे दो’ होतं. आता कुटूंब वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे असा सवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी म्हटले , येत्या १५ दिवसांत कोरोनाची लाट अजून वाढण्याची शक्यता आहे. केंद्राने आतापर्यंत सर्व राज्यांना हे अवगत करायला पाहिजे होतं पण त्यांनी अजूनपर्यंत केलं नाही. जर तसं झालं तर आधीच तुटपुंज्या प्रमाणात मिळणारा ऑक्सीजन अपुरा पडेल असे संकेत देखील त्यांनी दिले .
https://www.facebook.com/kaaltarangnews/videos/156210173012827
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 24, 2021, 6:34 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY