Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगली दौरा, दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 2, 2021 3:02 pm
|

सांगली, कोल्हापूर, कोकण भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती ओढावली आहे. यामुळे नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. आज मुख्यमंत्री पूरबाधित गावांची पाहणी करत आहेत. दरम्यान, पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली शहरात आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले नाही, असे म्हणून भाजपच्या काही कार्यकर्ते निवेदन फाडून घोषणाबाजी केली. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. निदर्शने करून घोषणाबाजी केल्याने भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, सकाळी अकरा वाजल्यापासून उद्धव ठाकरे अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज आणि सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ज्या क्षणी अतीवृष्टी होणार, संकट येणार हा एक अंदाज आला. तेव्हापासून प्रशासन कामाला लागले. शक्य होईल तिथल्या धोकादायक वस्त्यांमधील नागरिकांचे आपण स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 4 लाख नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. जीवितहानी होऊ नये, हा आपला प्रधान्यक्रम होता.’असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 2, 2021, 3:02 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *