“कर्जत जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार.”
कर्जत-जामखेड: कोरोना संकटाच्या काळात आरोग्यसुविधेला प्राधान्य देण्यासोबतच आपल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील इतर सोयीसुविधांबाबत कोणत्याही प्रकारची कसूर न सोडता जनहिताचे विविध प्रश्न सोडवण्यातही आ. रोहित पवार अग्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्जत व जामखेडमधील शेतक-यांच्या प्रश्नांचा ३६० डिग्री अँगल विचार करणा-या आ. रोहित पवारांच्या वखार उभारणीसंदर्भातील पाठपुराव्याला यश आले आहे.
कर्जत व जामखेड भागात शेतीचे प्रमाण अधिक असले तरी, या दोन्ही तालुक्यांमध्ये शेतक-यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसे. सरकारी हमीभाव केंद्र सुरु झाल्यानंतर मका, तूर यासारखे इतर धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. शेतमाल खरेदी पूर्णपणे करता येणे शक्य नव्हते. परिणामी शेतक-यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून रुजू होताच शेतक-यांच्या या प्रश्नाला गांभीर्याने घेत आ. रोहित पवार यांनी तातडीने यासंदर्भात पाठपुरावा सुरु केला व अखेर या पाठपुराव्याला यश आले असून शेतक-यांची शेतमाल ठेवण्याची समस्या कायमची नाहीशी होणार आहे.
राज्य वखार महामंडळाकडून कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे तर जामखेड तालुक्यात खर्डा येथे प्रत्येकी ३ हजार मेट्रीक टन क्षमतेचे अजस्त्र अशा वखार उभारणीच्या कामास मान्यता मिळाली आहे. येत्या काही दिवसात वखार महामंडळाकडून वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार आहे व वखार उभारणीचे कामही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या दोन्ही वखारींचा प्रामुख्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील हजारो शेतक-यांना शेतमाल, खते, बियाणे ठेवण्यासाठी उपयोग होणार आहे. तसेच कर्जत जामखेडसह आजूबाजूच्या तालुक्यातील शेतक-यांनाही या वखारींचा लाभ घेता येणार आहे. वखार उभारणीच्या कामाला मान्यता दिल्याबद्दल राज्य वखार महामंडळ व सहकार विभागाचे आ. रोहित पवार यांनी आभार मानले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 24, 2021, 6:28 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY