Breaking News

आनंदाची बातमी ; राज्यात २४ तासात ७१,७३६ रूग्ण करोनामुक्त

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 26, 2021 10:11 pm
|

मुंबई : महाराष्ट्राने सोमवारी दुहेरी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्यामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर राजधानी मुंबईतही संक्रमित लोकांची संख्या लक्षणीय घटली आहे. उद्धव सरकारने 1 मे पर्यंत अंमलात आणलेल्या साखळी तोडल्याचा परिणाम आता दिसू लागला आहे, राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ७१,७३६ जणांनी कोरोनावर मात केली. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, हि दिलासा देणारी बाब ठरली आहे.

आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नविन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्याने नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

रुग्ण बरे झाले

२० एप्रिलला ५४ हजार २२४ रुग्ण घरी सोडण्यात आले.
२१ एप्रिलला ५४ हजार ९८५,
२२ एप्रिलला ६२ हजार २९८,
२३ एप्रिलला ७४ हजार ४५,
२४ एप्रिलला ६३ हजार ८१८,
२५ एप्रिलला ६१ हजार ४५०
आज २६ एप्रिल रोजी ७१ हजार ७३६
एकूण ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 26, 2021, 10:11 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *