Breaking News

इचलकरंजी IGM रुग्णालयातील आग वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 11, 2021 5:34 pm
|

इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयात (IGM hospital) हायफ्लो मशीनला अचानकपणे आग लागली. या घटनेत हायफ्लो मशीन (highflow machine) जळून खाक झाले. या माशीनवरील उपचार सुरू असणाऱ्या बाधित रुग्णाला त्वरित जम्बो सिलिंडरच्या साहाय्याने ऑक्सिजन (oxygen) देऊन सुखरूप स्थळी हलवले. दुपारी बाराच्या सुमारास ही आग लागली. या मशीनच्या जळण्याने संपूर्ण आयसीयू युनिटमध्ये (ICU unit) धुराचे लोट पसरले होते. सुरक्षारक्षक व परिचारिका यांच्या प्रयत्नांमुळे आयसीयू युनिट पूर्वस्थितीत आणले.

दरम्यान , प्रसंगावधान राखून वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या परिस्थितीबाबत माहिती घेत, त्यांची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या घटनेची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी रुग्णालय प्रशासन तसेच विविध यंत्रणांकडून माहिती घेतली व याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले.

घटनाक्रमाची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी घटनास्थळावर धाडसाने, प्रसंगावधान राखून आग रोखण्यासाठी तत्काळ धावपळ कऱणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविंद्र शेटे तसेच वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक, डॉक्टर्स अशा सर्वांचे आणि त्यांच्या समन्वयाचे कौतुक केले. यांनी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सुखरूप राहावेत यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा करून त्यांची काळजी घेण्याचे निर्देशही दिले


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 11, 2021, 5:34 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *