जिवंत माणूसला अंत्यसंस्कारासाठी नेण्याची घाई ;भाजप प्रवक्त्याचा दावा सत्य की असत्य – (video)
मुंबई : सध्या राज्यात दररोज मृतांच्या आकड्यासोबतच नव्या करोनाबाधितांचे आकडे देखील रोज नवनवे उच्चांक गाठत आहेत. . त्यामुळे अनेक स्मशानभूमी समोर शववाहिकेच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक नातेवाईक आपल्या मृत नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेवर सोपवते. असाच स्मशानभूमीबाहेरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका शववाहिकेममध्ये जिवंत माणूस स्मशानभूमीवर आणण्यात आला आहे.
यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुरेश नखवा य़ांनी हा व्हिडीओ ट्विटर अकाउंटवरून ट्वीट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘हे धक्कादायक आहे, जिवंत माणसाला मुंबई महानगरपालिकेने अंत्य़संस्कारासाठी आणलं आहे. असं म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.दरम्यान हा व्हिडीओ शेअर करताना संबंधितानं मुंबई महापालिकेचा उल्लेख केला.
https://twitter.com/SureshNakhua/status/1384483137309216770
यावरून मुंबई महापालिकेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाखुआ यांनी हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडलवरुन त्याला उत्तर देण्यात आलंय. ‘सर, आपल्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानुसार आम्ही तुम्हाला विनंती केली की, या व्हिडीओचं मूळ आणि सत्यता तपासून पाहा. मात्र, तुम्हालाही या व्हिडीओचं मूळ स्थान आणि सत्यतेबद्दल खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही तुमच्याकडून माहितीची वाट पाहत आहोत. त्यानंतर याबाबत पुढील कारवाईचा विचार केला जाईल’ असं ट्वीट मुंबई महापालिकेनं केलं आहे.
यासंदर्भात इक्बालसिंग चहल यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, हा मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सुरेश नाखुआ यांना फोन करतोय पण ते फोन घेत नाहीत. आम्ही त्यांना ट्वीट केलेल्या व्हिडीओबद्दल विचारतो आहोत, मात्र ते प्रतिसाद देत नाहीत. आम्ही आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहोत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 21, 2021, 9:54 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY