मुंबई लोकल व दुकानाच्या वेळेबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले…
सांगली:, कोल्हापूर, कोकण भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती ओढावली आहे. यामुळे नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. आज मुख्यमंत्री पूरबाधित गावांची पाहणी करत आहेत. दरम्यान, सकाळी अकरा वाजल्यापासून उद्धव ठाकरे अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज आणि सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी करत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना स्थिती नियंत्रणात असलेल्या शहारासाठी दिलासादायक माहिती दिली आहे. राज्यात 11 जिल्हे वगळता जेथे कोविड 19 आटोक्यात आहे तेथे आता व्यापारी आणि दुकानदारांना दिलासा मिळू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यामध्ये मुख्य शहरात आता दुकानं उघडी ठेवण्याची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. रुग्ण वाढ कमी होत नाही तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील.लवकरच त्याचा अध्यादेश जारी केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीत पुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. या
दरम्यान दुकानांच्या वेळेसोबतच मुंबई लोकल बाबतची मुख्यमंत्र्यांनी अपडेट देताना कोरोना नियमावलीमधून हळूहळू शिथिलता मिळेल. त्यामुळे ज्यामधून मोकळीक मिळणार त्याचे परिणाम पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबई लोकल सर्वांसाठी सध्याच्या टप्प्यावर सुरू केली जाणार नाही असेदेखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील मुख्य शहरात असलेल्या कार्यालयांनाही मालकांनी वेळेचं बंधन घालून कर्मचार्यांची कामाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना कामाच्या वेळा विभागण्याची विनंती केली आहे.. वर्क फ्रॉम होमचे नियोजन करा. उद्योगांना शक्य आहे तिथे बायो बबलचा अवलंब करावा. आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा.असं आवाहन केले आहे. उद्योग धंद्यांच्या ठिकाणी देखील बायोबाबल मध्ये कर्मचारी राहतील असे पहा म्हणजे आगामी कोरोना लाटेत पुन्हा उद्योगधंदे बंद पडणार नाहीत असेदेखील त्यांनी सूचवले आहे.
दरम्यान नियमांमधून मुभा मिळाली तरीही कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर अर्थात मास्क, हॅन्ड सॅन्टिटाईज आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कारण केंद्राच्या अहवालानुसार कोरोनाच्या तिसर्या लाटेत स्थिती बिकट झाल्यास ऑक्सिजन मागील लाटेपेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक लागू शकतो.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 2, 2021, 3:34 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY