Breaking News

‘महाराष्ट्राला रेमडेसिविर विकू नका अन्यथा परवाना रद्द , केंद्राची कंपन्यांना धमकी’, नवाब मलिकांचे गंभीर आरोप

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 17, 2021 5:03 pm
|

मुंबई: राज्यातील कोरोना परिस्थिती ही गंभीर बनली आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार आणि यामुळे तुटवडा भासत आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहे.(nawab malik allegations against central government over remdesivir) महाराष्ट्राला रेमडेसिविर विकू नका अन्यथा तुमच्यावर कारवाई करु अशी धमकी केंद्राने कंपन्यांना दिली असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिविरची कमतरता भासत आहे. त्यामुळे आता या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारकडे या निर्यातदारांकडून रेमडेसिविरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशाराही मलिकांनी दिला आहे. आपल्या देशात 16 निर्यात देणारे यूनिट्स आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिविरचे 20 लाख इंजेक्शन आहेत, कारण आता सरकारकडून निर्यातीवर बंदी घातली गेली आहे. हे निर्यातदार आपल्या देशात हे औषध विकायला परवानगी मागत आहेत. पण केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असून हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या 16 निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 17, 2021, 5:03 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *