परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज निर्णय, गृहमंत्र्यांविरूद्ध सीबीआय चौकशीबाबतही निर्णय होणार
मुंबई :अँटिलिया प्रकरणावरुन मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर वसूलीचे आरोप केले होते. परमबीर यांचा दावा आहे की गृहमंत्री देशमुख सचिन वाझेसोबत आपल्या बंगल्यावर सतत बैठक घेत होते. यावेळी 100 कोटी वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, त्या निर्णयावर आज मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी वसूलीचे गंभीर आरोप लावले होते. याचिकेत म्हटल्यानुसार सिंह यांनी गृहमंत्र्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यासोबतच पोलिस आयुक्त पदावरुन बदली करण्याच्या आदेशालाही आव्हान दिले आहेत. त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांची सीबीआय चौकशी होणार की नाही? हे आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
दरम्यान बॉम्बे हाय कोर्टाने परमबीर सिंह यांच्यासह अजून 2 दोन याचिका कोर्टात फेटाळल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी तुम्हांला गुन्हा ठाऊक होता मग त्याची तक्रार का नोंदवली नाही? असा सवाल विचारत फटकारले होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायलयातही सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी टाळत त्यांना उच्च न्यायलयात जाण्याचे आदेश दिले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 5, 2021, 12:22 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY