सावधान; कोरोना थुंकीनं वाढतो! (ब्लॉग )
अलिकडे कोरोनाची लाट पुन्हा परतून आली असून हा कोरोना काही भागात अजुनही कहरच ओतत आहे. याच कोरोनाच्या पाश्वभुमीवर लोकं विचार करु लागले आहेत की कोरोना वाढत कसा चाललाय.कोरोनाबाबत विचार केल्यास लोकांमध्ये आजही दहशत आहे. त्यामुळं काही लोकं आजही गर्दीच्या ठिकाणी जायला घाबरतात. मास्क बांधतात. सानिटायझरही लावतात. एवढंच नाही तर हातही स्वच्छ धुतात. कोरोना होवू नये म्हणून फार काळजी घेतात. तरीही कोरोना वाढतोच. त्यामुळं जास्त प्रमाणात चिंता वाटायला लागलेली असून हा कोरोना नक्कीच जग संपवेल काय असेही वाटायला लागले आहे.
कोरोना वाढण्याची कारणं शोधत असतांना नेमकं एक कारणही पुढं येतं, ते म्हणजे जागोजागी थुंकणं. या थुंकण्यावर सरकारनं प्रतिबिंबही लावलेले अाहे. तरीही लोकं थुंकतातच. थुंकतांना आपण कुठे थुंकतो हे काही पाहात नाही. अशामुळे ज्याला कोरोना आहे, असा व्यक्ती थुंकल्यानं त्यांच्या थुंकीत असंख्य रोगाचे विषाणू असतात. जे आजार पसरवतात. त्यामुळं कोरोना हाही पसरायला मार्ग मोकळा होतो. अलिकडे लोकं खर्रे बिनधास्त खायला लागले. त्यातच त्या ख-यात जी थुंक येते, ती थुंक लोकं कुठेही थुंकतात. तसेच तंबाखूही खाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या तंबाखातून येणारी थुंकही खाणारी व्यक्ती कुठेही थुंकते. यामुळं समस्या निर्माण होते. अलिकडे काही महाभाग हे गाड्या चालवीत असतांना मागे कोण येत आहे हे न पाहता थुंकतात. ती थुंक मागे येणा-यांच्या तोंडावर जाते. त्यातच तोंड उघडं जर असेल तर ती थुंक तोंडाच्या आत जाते. या थुंकीत जर कोरोनाचे जंतू असतील तर कोरोना नक्कीच पसरतो. म्हणून सरकार सांगत आहे की मास्क वापरा. पण मास्क न लावता बिनधास्त फिरणारे काही महाभाग आहे. कोरोना पसरणार नाही तर काय?या थुंकीबाबत विचार केल्यास पुर्वीच्या काळी लोकं पान खायचे. त्यांना खर्रा समजत नव्हता. त्यातही त्यांना थुंकीनं आजार पसरतो हे देखील पाहिजे त्या प्रमाणात समजत नव्हतं. त्यामुळं की काय, ते पान खावून थुंकायचे. त्यामुळे आजार वाढायचा व साथीच्या साथी यायच्या. तेव्हा तंत्रज्ञानाचा पाहिजे त्या प्रमाणात शोध लागला नव्हता. काही तांत्रीक, मांत्रीक लोकं त्या आजारावर काही जडीबुटी द्यायचे. ह्या जड्याबुट्या आजारावर नसायच्या. ह्या जड्याबुट्या माणसाच्या रोगप्रतिकारशक्ती वाढविणा-या असायच्या. मग माणसाच्या शरीरात या जड्याबुट्यांनी रोगप्रतिकारक शक्ती तयार व्हायची. त्यामुळं आपोआपच तो रोग हद्दपार व्हायचा. याचाच अर्थ असा की ज्याप्रमाणे एका जंगलात दोन शेर राहू शकत नाही, अगदी तोच प्रकार जंतूबाबत व्हायचा. प्रतिकारशक्ती निर्माण होताच जंतू त्या शरीराला अपाय करण्याऐवजी त्यांच्या शरीरातून निघून जायचे. ते जंतू थुंकीवाटेच निघून जायचे. कारण पुर्वी औषधांचा तेवढा शोध लागलेला नव्हता.
आज औषधांचा शोध लागला आहे. आपण औषधी घेतो. जी औषधी आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीच नष्ट करते. आपण फास्टफुड खातो. जे फास्टफुड आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीच नष्ट करते. तसेच एखाद्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती असेल. तर तो आपल्या प्रतिकारशक्तीचा उपयोग करुन जंतूंना थुंकीद्वारे बाहेर फेकतो. त्याला काय माहित असतं की त्याच्या थुंकीत असंख्य आजाराचे जंतू आहेत. कारण प्रत्येकच माणूस तेवढा शिकलेला नाही. तसेच जे शिकलेले आहेत. तेही आपल्याला काय करायचं असं समजून बिनधास्तपणे थुंकतात. काही महाभागही मास्क तर लावतातच. पण खर्रे तोंडात भरलेले असतात. ते मास्क खाली सरकवून कुठेही थुंकतात. ज्या थुंकीत जंतू असतात.मुख्यतः अशाच थुंकीमुळं कोरोना पसरायला वाव मिळत असून सरकारनं अशा थुंकणा-यावर जास्तीत जास्त दंड लावायला हवेत. जेणेकरुन कोरोनाचा प्रसार होवू नये. कोरोना हद्दपार व्हावा. कारण कोरोनामुळंच जनजीवन विस्कळीत झाले असून कोरोना वाढत आहे. पण संपण्याची चिन्ह दिसत नाहीत.
मागे ज्यावेळी कडक लाकडावून होतं, त्यावेळी काही पानठेले बंद होते. दुकानं बरीचशी बंद होती. त्यातच लोकांनी खर्रे किंवा तंबाखूजन्य पदार्थ घरोघरी नेवून विकले. त्यातच काही लोकं घरात असली तरी काही लोकं रस्त्यानं फिरत होती. ती थुंकतही होती. पोलिसांचा सक्त पहारा होता. पण पोलिस थुंकणा-या व्यक्तीला कुठंपर्यंत पाहणार. महत्वाचं म्हणजे थुंकणा-या व्यक्तीला स्वतः समजायला हवं की आपण कसं थुंकावं. थुंकण्यानं आजार वाढतो. हा आजार आपल्याच भावा बहिणींना, मातापित्यांना होतो. कारण या देशात आपलेच भाऊबहिण, मातापिता निवास करतात. त्यांनाही हा आजार होवू शकतो असा विचार प्रत्येकांनी करायला हवा. खर्रे खावे, पानही खावे, खायला मनाई नाही. पण खातांना थोडासा विचार करावा की थुंकावे कसे. थुंकल्यास काय होईल. कदाचित एखाद्याच्या थुंकीनं कोरोना होईल. तो कोरोना आपल्याच घरी होईल. ज्यामुळे आपल्याला पश्चातापाला सामोरे जावे लागेल. म्हणून थुंकण्यापुर्वी सावधान राहा. कोरोना कोणत्या रुपात घरात प्रवेश करेल ते सांगता येत नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 3, 2021, 11:24 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY