अनिल देशमुख यांचा चौथ्यांदा ED समोर हजर राहण्यास नकार , ईडीवर केले त्यांनी प्रश्न उपस्थित , म्हणाले-
मुंबई, : 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीनं (ED)चौथ्यांदा समन्स बजावला आहे. तसंच ईडीने अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे पुत्र ऋषिकेश यांना सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या बॅलार्ड पीयर येथील कार्यालयात चौकशीस उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला. मात्र हजर राहू शकत नसल्याचं देशमुख यांनी निवेदन दिले आहे.तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.
अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाण्यास नकार देत ईडीला वकिलांमार्फत पत्र दिलं आहे. अनिल देशमुख यांनी त्यांच्या पत्रात ईडीच्या तपासावर आरोप केले आहेत.अनिल देशमुख यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात तपास यंत्रणेवर कारवाईच्या वेळी आपल्या अधिकार आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की मला आजपर्यंत ईडी कडून ईसीआयआरची प्रत किंवा कोणतेही कागदपत्र दिले गेले नाहीत. ज्यावरून हे स्पष्ट झाले आहे की हा समन्स केवळ प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ निर्माण करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या 1 दिवस आधी ईडीने पाठवलेले समन्स यामुळे ईडीकडून केला जाणार तपास हा निष्पक्ष आणि न्याय्य नसल्याचं देशमुखांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री या नात्याने अनिल देशमुख यांनी १०० कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर, ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. देशमुख यांना ४० कोटी रुपयांची खंडणी मुंबईतील बारमालकांकडून मिळाली असल्याची ठोस माहिती ईडीला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, देशमुख व त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीतील ४.२१ कोटी रुपयांची खंडणीदेखील ईडीने जप्त केली आहे. देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक यांनादेखील या प्रकरणी अटक झाली आहे. पण देशमुख यांची चौकशी ईडीला अद्याप करता आलेली नाही. त्यासाठीच ईडीने देखमुख यांना याआधी तीन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण वेगवेगळी कारणे देऊन ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यानंतर आता चौथ्यांदा हे समन्स बजावण्यात आले आहे.
राज्यात 12 ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन राबवत अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले. राज्यातील मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), नाशिक, (Nashik), सांगली (Sangli) आणि अहमदनगर येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी छापे टाकत सर्च ऑपरेशन केले .
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 2, 2021, 2:04 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY