राष्ट्रवादीचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार, थोडक्यात बचावले , शहरात खळबळ
पुणे : पुण्यानंतर पिंपरी चिंचवडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तान्हाजी पवार असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तुलातून आमदार बनसोडे यांच्या दिशेनं गोळी झाडली. सुदैवाने ते बचावले असून, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आरोपी तान्हाजी पवार याला पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ‘याप्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील’, असे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले बनसोडे म्हणाले,”अॅन्थनी म्हणून एक कंत्राटदार आहे. मी त्याला ओळखत नाही. तीन साडेतीन वर्षांपासून तो आमच्याकडे काम करतोय. त्याचा तान्हाजी पवार म्हणून एक सुपरवायझर आहे. त्याला माझ्या पीएने फोन केला होता. मागच्या दहा दिवसांपासून त्याला फोन करतोय. दोन मुलं कामाला घे इतकंच त्याला सांगितलं होतं. बोलतानाच त्याने अरेरावी केली. तेव्हढंच झालं. त्यानंतर तो आज सकाळी आला. माझ्यासोबत त्याचं बोलणं झालं. मी त्याला विषय सोडून द्यायला सांगितलं. त्याच्या मालकालाही मी याबद्दल बोललो. दरम्यान, तो कार्यालयाच्या बाहेर आला आणि त्याने गोळीबारच केला. येताना तो पूर्वनियोजन करुनच आला असावा, कारण त्याने सोबत त्याचा साथीदार, त्याचा मेहुणा होता. त्यांच्याकडेही पिस्तुल होतं,” असं आमदार बनसोडे म्हणाले. अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असून,अजित पवार यांचे ते विश्वासू आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 12, 2021, 5:29 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY