Breaking News

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीनंतर घरी परतलेल्या झेडपीच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर फरार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 11, 2021 5:41 pm
|

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर अडकल्या आहेत. तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरता 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाची रात्री उशिरापर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात चौकशी सुरू होती. कोरोनाकाळात ग्रामीण भागातील शाळांचे नियोजन आणि इतर महत्वाच्या कामांची वैशाली वीर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असतानाच हा प्रकार समोर आल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांची लाच शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून स्वीकारल्याच्या कारणातून नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. रात्री महिला संशयितेस अटक करण्याची पोलिसांची वेगळी पद्धत असून सूर्यास्त झाल्यानंतर महिलेस अटक न करण्याचा नियम आहे. काल संशयित वीर यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले, बुधवारी पोलिसांत हजर होण्याची हमी घेत संशयित वीर यांना घरी जाऊ दिले. आज मात्र त्या पोलिस स्टेशनमध्ये आल्याच नाहीत असे पोलिस अधिकाऱ्यानी सांगितले. या प्रकरणात अटक केलेल्या दोघांना नाशिकच्या न्यायालयाने १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले होते. या मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे संस्थेस नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी संस्थेकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. यावेळी संस्थेकडे सुमारे ९ लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. यावेळी तक्रारदार यांनी तडजोडीअंती आठ लाख रुपये देण्याचे कबूल केले.या प्रकरणातील अन्य दोन संशयित शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते या दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या दोघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैशाली वीर यांनी अशाप्रकारे गैरमार्गाने अजून किती संपत्ती गोळा केलीय ? यात अजून कोणा कोणाचा सहभाग आहे ? हे आता चौकशीनंतरच समोर येईल.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 11, 2021, 5:41 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *