Breaking News : संदिपान भुमरे यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री
यवतमाळ : शिवसेना नेते आणि राज्याचे रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री संदीपान भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. आजच राज्य सरकारने त्यांना यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त केले. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे होते. पण, संजय राठोड यांचे पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री नव्हता. आज अखेर राज्य सरकारने संदिपान भूमरे यांच्या रुपाने जिल्ह्याला नवा पालकमंत्री दिला आहे .
कोण आहेत संदिपान भुमरे?
संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. सध्या ते महाविकास आघाडी सरकारमध्ये फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 16, 2021, 4:04 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY