Breaking :आदित्य ठाकरे अपघातातून थोडक्यात बचावले ,अनर्थ टळला

मुंबईः राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात बैठक घेत असतांना थोडक्यात बचावले आहेत. हा अपघात अतिथीगृहात झालाअसून बैठक सुरू असताना या चार क्रमांकाच्या सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह (फॉल्स सीलिंग) कोसळले. संध्याकाळी हा अपघात झाला.
सुदैवाने घटनास्थळापासून थोड्या अंतरावर बैठक सुरू होती. यामुळे आदित्य ठाकरे आणि बैठकीला उपस्थित अधिकारी वर्ग थोडक्यात बचावला. सर्वजण सुखरुप असून त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून बैठक व्यवस्थित पार पडली. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तिथे तातडीने साफसफाईचे काम हाती घेण्यात आले. नंतर आवश्यक ती दुरुस्ती करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान शिवसेनेच्या काही नेत्यांनी अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 5, 2021, 11:14 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY