Breaking News

‘जर देश वाचवायचा असेल तर रुग्णालय बांधावे लागतील’ ;बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 17, 2021 7:21 pm
|

लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी देवदूत म्हणून समोर आलेल्या अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. सोनूने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.सोनू सूद हा विलगीकरणात उपचार घेत आहे. सध्या त्याची प्रकृती नीट असल्याची माहिती मिळत आहे.

‘नमस्कार मित्रांनो. माझी कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. काळजीची गोष्ट नाही. उलट आता माझ्याजवळ तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आणखी जास्त वेळ असेल,’ असे सोनू म्हणाला आहे. सोबतच कोणताही त्रास असला तरी मी कायम तुमच्यासोबत आहे, असा विश्वासदेखील त्याने आपल्या चाहत्यांना दिला आहे.

https://www.instagram.com/p/CNwmRibg_XC/?utm_source=ig_web_copy_link

व्यक्त केली होती चिंता

कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत आहे. इंजेक्शन, बेड्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाच्या काळात आपल्याला मिळालेल्या धड्याबद्दल त्याने सांगितले आहे. ‘जर देश वाचवायचा असेल तर रुग्णालय बांधावे लागतील’, असे सोनूने म्हटले.अलीकडेच सोनू सूदने आपल्या सोशल मीडियावर सांगितले होते की, त्याने गरजूंना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इंदूरमधील गरजूंना 10 ऑक्सिजन सिलिंडर पाठविले आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 17, 2021, 7:21 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *