मृतदेहांची अवहेलना :धावत्या गाडीतून रस्त्यावर पडला कोरोना संक्रमितांचे मृतदेह
मध्यप्रदेशातील विदिशा मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहांची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना संक्रमितांचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या धावत्या गाडीतून मृतदेह रस्त्यावर पडला. मृतदेह पडल्याचे पाहिल्यानंतर रस्त्यावरील लोकांनी आवाज देऊन गाडी चालकाला थांबवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मृतदेह स्मशानभूमी नेण्याच्या घाईत, संक्रमित व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर वाहनातून खाली पडला. एका वाहनात दोन मृतदेह ठेवता येतात. पण, या गाडीत तीन मृतदेह ठेवले होते. यावेळी धावत्या गाडीतून एक मृतदेह रस्त्यावर पडला. मृतदेह रस्त्यावर पडल्यानंतर काही लोकांनी वाहन चालकाला थांबवले आणि नंतर मृतदेह गाडीत ठेवून स्मशानभूमीकडे नेण्यात आला..दरम्यान ,मृतदेह नेण्यासाठी एक वाहन नगरपालिकेने दिले आहे तर दुसरे वाहन रक्त सहाय्य सेवा समितीने सेवेसाठी दिले आहे. दोन्ही वाहनांची हालत खराब झाली आहे. या वाहनांमधून दरदिवशी मृतदेह विदिशासह सांचीच्या स्मशानभूमीत नेले जातात. शुक्रवारीच दुपारपर्यंत 16 जणांचे मृतदेह मेडिकल कॉलेजमधून स्मशानभूमीत हलविण्यात आले.
मध्यप्रदेशात :धावत्या गाडीतून रस्त्यावर पडला कोरोना संक्रमिताचा मृतदेह, #mpnews #vidisha #CoronavirusPandemic pic.twitter.com/ZPlNurKJhq
— Kaaltarang News Marathi (@kaaltarangnews) April 23, 2021
तसेच विदिशाच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमधून यापूर्वीही धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 एप्रिलला संशयित कोरोना रुग्णाला दोनवेळा मृत घोषित केले होते. कुटुंबियांना मृत्यू प्रमाणापत्रही दिले होते. कुटुंबिय अंत्यविधीची तयारी करू लागले, तेव्हा हॉस्पिटलमधून फोन आला, तुमचा पेशंट जिवंत आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 23, 2021, 8:16 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY