नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलत असतात का ?, सिध्द करा नाही तर माफी मागून तोंड काळे करा : अतुल भातखळकर
मुंबई : ”महाराष्ट्राला रेमडेसिवीर पुरविले तर कंपन्यांवर कारवाई करू, अशी केंद्र सरकारने कंपन्यांना धमकी दिली हा नवाब मलिक यांचा आरोप केला आहे दरम्यान ,ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्राने महाराष्ट्राला पुरविली नाही तर आम्ही औषध साठा जप्त करू, असा इशारा मलिक यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी नवाब मलिक यांना सवाल करत पलटवार केला आहे.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. ‘ते म्हणाले ‘महाराष्ट्राला रेमडेसिवीर पुरवली तर खबरदार’ अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिली म्हणे! नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलत असतात का ? माझे त्यांना आव्हान आहे, आपले म्हणणे सिध्द करा नाही तर माफी मागून तोंड काळे करा असे म्हणत अतुल भातखळकर यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे.
अशा प्रकारचे म्हणजे बेशरमपणा आणि खोटारडेपणाचा कळस आहे, नवाब मलिकांनी आपल्या या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी,” अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
”राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेडचा तुटवडा आहे, असे मलिक म्हणतात, मग यांचे मंत्री कुठे आहेत, हे बिळात लपून बसले आहेत का. टि्वटरवरुन असे खोटे व बेशरमपणाचे आरोप मलिक करीत आहेत. त्यांनी पुरावे द्यावेत. जनतेची माफी मागा..अन्यथा राजीनामा द्या,” असे भातखळकर यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनीही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा तुटवडा यावरुन अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली होती. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्राने महाराष्ट्राला पुरविली नाही तर आम्ही औषध साठा जप्त करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी नवाब मलिक यांना सवाल केला आहे. केंद्र सरकारने रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे देशातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाही. केंद्रसरकारने त्याला नकार दिला आहे, असे मलिक यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाले नवाब मलिक
जनतेचा जीव वाचवण्यासाठी ही जी औषधी आहेत, त्यांना विकण्याची परवानगी द्या, जर तुम्ही परवानगी दिली नाही तर आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. ही सगळी औषधं जी महाराष्ट्राचा जमिनीवर आहेत, निश्चितरूपाने एफडीएच…16 निर्यात कंपन्यांकडे राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनाबाबत विचारले. केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी आम्हाला दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असल्याचे मलिक यांनी सांगितले. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 17, 2021, 7:43 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY