West Bengal Election 2021 Result Live: नंदीग्राम जागेवर ममता बॅनर्जी यांचा पराभव, ,कोर्टात जाण्याचा इशारा

कोलकाता –पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतांची मोजणी सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीत बंगालच्या नंदीग्राममधील सर्वाधिक चर्चेत व हाय-प्रोफाइल असलेल्या जागेबद्दल वाद सुरू झाला आहे. पूर्वी ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांना १२०० मतांनी पराभूत केले असे म्हटले जात होते, तर आता भाजपने दावा केला आहे की शुभेंदू अधिकारी यांनी येथे ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. वृत्तानुसार ममता बॅनर्जी यांनीही पत्रकार परिषदेत आपला पराभव स्वीकारला आहे. मात्र, टीएमसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे की नंदीग्राममधील मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही आणि कोणीही अंदाज बांधू नये.
The counting process for Nandigram has not been completed. Please do not speculate.
— All India Trinamool Congress (@AITCofficial) May 2, 2021
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूकीत ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला. त्याचवेळी ममतांनी नंदीग्राममध्ये आपला सुवेंदू अधिकारींनी केलेला पराभव मान्य केला. आधी ममता दमत – भागत १२०० मतांनी जिंकल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने जाहीर केले होते. पण प्रेस कॉन्फरन्समध्ये ममतांनी आपला स्वतःचा पराभव मान्य केला.
West Bengal CM Mamata Banerjee wins Nandigram constituency by 1200 votes, defeating BJP's Suvendu Adhikari.
(File photo) pic.twitter.com/kMzRKcmqJH
— ANI (@ANI) May 2, 2021
ऐतिहासिक विजयानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. निवडणूकीत जे आरोप ममतांनी भाजपवर लावले. त्या सगळ्या आरोपांचा त्यांनी पुनरूच्चार केला. त्याच वेळी त्यांनी लोकशाही, राज्यघटना स्पिरीटचा उल्लेख केला. बंगालमध्ये भाजपने धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मनी, मसल, माफिया पॉवरचा वापर करून निवडणूक लढविली. पण बंगाली जनतेने त्यांचा पराभव केल्याचे वक्तव्य ममतांनी केले.एकीकडे हा विजय बंगाली माणसाचा, भारतीयांचा आणि लोकशाहीचा आहे, असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपचा एजंट असल्यासारखा वागल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाविरोधात सुप्रिम कोर्टाच्या घटनापीठाकडे दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Congratulations to the Chief Minister of West Bengal, @MamataOfficial Didi on her party’s victory in West Bengal assembly elections. My best wishes to her for her next tenure.
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) May 2, 2021
EC Official trends | BJP candidate from Nandigram, Suvendu Adhikari leads by 6 votes after the 16th round of counting#WestBengalElections2021
— ANI (@ANI) May 2, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 2, 2021, 7:26 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY