Breaking News

भाजप आमदार अतुल भातखळकर यांना अटक

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 17, 2021 11:20 am
|

मुंबई :भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एमएमआरडीएने मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामाचा वाद रंगला आहे. मालाड येथील कुरार मेट्रो स्टेशन ( Kurar Metro Station) कामांसाठी परिसरातील काही झोपडपट्टींचे पाडकाम करण्या येत होते. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) उपस्थिती शनिवारी (17 जुलै) सुरु असलेल्या या कारवाईस स्थानिकांनी विरोध केला. या कामाला विरोध करणाऱ्या रहिवाशांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली. भाजप आमदार अतुल भातखळकर यांना या कामाबाबत माहिती कळताच त्यांनीही घटनास्थळी दाखल होत कारवाईस विरोध केला. कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करणारे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दम्यान, याप्रकरणी भातखळकर यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मला अटक करण्यात आल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अतूल भातखळकर यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदघाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत. भातखळकर यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा… पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं.

अतूल भातखळकर ट्विट

दरम्यान, भातखळकर यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी… हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 17, 2021, 11:20 am
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *