इंजेक्शन चोर भाजप नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करा (video)
मुंबई :रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांची आणि ते मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण होत असताना उभय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाद तापणार असल्याची चिन्हं आहेत. भाजपचे नंदुरबारचे नेते शिरीष चौधरी यांच्या हॉटेलमध्ये रेमडेसिवीरचा साठा करण्यात आल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेते आणि ब्रुक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करा, अशी मागणी केली. काही दिवसांपूर्वी शिरीष चौधरी यांनी अंमळनेर आणि नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले होते.
सचिन सावंत यांनी शिरीष चौधरी यांचा इंजेक्शन वाटतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. “इंजेक्शन चोर भाजप नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा. ८ एप्रिल व १२ एप्रिलला भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर व नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना औषध खाजगी रित्या कशी वाटली?” असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.“ब्रूक फार्मा कंपनी म्हणते दमण प्रशासनाने तीला महाराष्ट्रात वितरण करण्यास परवानगी दिली नाही मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? फडणवीस व दरेकर यांना मार्ग दाखविणारे शिरीष चौधरी दरेकर व लाड यांच्या बरोबर दमणला गेले होते. लोकांकडून अनधिकृत पणे पैसे घेतले गेले. हे भयानक आहे,” असं सचिन सावंत म्हणाले. तसंच डीसीपी मंजूनाथ सिंगे यांनी योग्य कारवाई केली होती. भाजप नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते. तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली.
https://twitter.com/sachin_inc/status/1384460814011310080
He accompanied Darekar Ji & Lad to Daman. The plan of BJP was same to elicit Money from common ppl.
The action by DCP Manjunath Singe was right. There was a collusion between Brucke pharma and BJP. This is dreadful! pic.twitter.com/NDMXzMuO7x— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 20, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 20, 2021, 10:03 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY