Breaking News

मोठी बातमी : मुंबईत मालवणी परिसरात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 10, 2021 3:05 pm
|

मुंबईत : बुधवारी (9 जुलै) दिवसभर पावसाचा कहर पाहायला मळाला. प्रामुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहिल्याच दिवशी पावसाने मुसळदार आगमन केल्याने मुंबईकरांची त्रेधातीरपीट तर उडालीच. याचवेळी काल रात्री(9 जून) मुंबईच्या मालवणी मालाड (Malvani Malad) परिसरात दुमजली इमारत कोसळल्याची घटना देखील घडली आहे. या दुर्घटनेत आता आलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मृतांचा आकडा 11 वर पोहोचला असून जखमींची संख्या 7 वर पोहोचली आहे. दरम्यान सदर दुर्घटनेत या आकरा जणांमधील 9 जण एकाच कुटुंबातील असून, त्यात सहा लहान मुलांचा समावेश आहे.तर 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे अशी माहिती मिळत आहे.

यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेतीच माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरातील गल्ल्या आकराने लहान असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. गल्लींची रुंदी लहान असल्यामुळे अँबुलंस, फायर ब्रिगेडची गाडी आणि जेसीबीला आत जाण्यासाठी अडचणी येत आहेत. ही घटना कशी घडली याबाबत पोलिस तपास करत आहेत.तसेच या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 10, 2021, 3:05 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *