मोठी घोषणा: राज्यातील प्रत्येक पोलिस शिपाई होणार आता निवृत्तीपर्यंत PSI
पुणे : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे . या घोषणा राज्यातील प्रत्येक पोलिस शिपाई आणि कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने सुखद धक्का दिला आहे. आता राज्यभरातील पोलिस शिपाई आपल्या निवृत्तीपर्यंत पोलिस उपनिरीक्षक (PSI) होता येणार आहे. . पोलिस दलात शिपाई या पदावर रुजू होणाऱ्या प्रत्येकाची आता पोलिस उप-निरीक्षक पदावर निवृत्ती होईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केली आहे.
पोलिस दलात शिपाई या पदावर रुजू होणाऱ्या प्रत्येकाची पोलिस उप-निरीक्षक होण्यासाठी धडपड सुरू असते. कठोर मेहनत आणि ड्युटीचे तास यांचे नियोजन लावून काही परीक्षा देऊन पीएसआय होतात. तर काही विशेष कामगिरी आणि कर्तृत्वाने पदोन्नती मिळवतातही. पण, बहुतांश शिपायांना निवृत्तीच्या वेळी केवळ सहाय्यक पोलिस उप-निरीक्षक (ASI) पदावर निवृत्त व्हावे लागते. काही पोलिस कर्मचारी तर त्यापूर्वीच निवृत्त होतात. त्याचीच दखल आता गृहमंत्र्यांनी घेतली आहे.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, गृह विभाग पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नागरिकांचे मित्र म्हणून भूमिका बजावत असताना त्यांच्याकडून प्रेम व आस्था मिळविण्यासाठी प्रयत्न करा. राज्यातील प्रत्येक शिपाई पीएसआय पदावर निवृत्त होणार असा एक प्रस्ताव गृहमंत्र्यांनी राज्य सरकारला पाठवणार आहेत. यामुळे राज्य सरकारवर फारसा आर्थिक भारही पडणार नाही. या प्रस्तावाबाबत एकत्र बसून निश्चीत चर्चा केली जाईल असे कार्यक्रमात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. पुण्यातील ग्रामीण पोलिसांच्या वतीने उभारण्यात आलेल्या एका पेट्रोल पंपाचे उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मिलिंद मोहिते, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक पी.एस. रवी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 2, 2021, 12:52 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY