Breaking News

Bhaskar Jadhav: ‘भाजप आमदारांनी मला शिव्या दिल्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला!’: भास्कर जाधव

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 5, 2021 9:33 pm
|

मुंबई : विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी अधिवेशनात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे आमदार आमने-सामने आले. यांच्यात धक्काबुक्की झाल्याचेही पाहायला मिळाले. यावरुन भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान आज तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव काम करत होते. सभागृहाचं काम सुरू असताना आरक्षणावरून सकाळपासूनच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडत होते. ओबीसी आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांनी इम्पिरीकल डेटा केंद्राकडे मागण्यावरून ठराव मांडत असताना विरोधी पक्ष नेत्यांना बोलू न दिल्याने भाजपा आमदार संतापले आणि आवाजी मतदाना दरम्यान गोंधळ घातला. भास्कर जाधवांनी त्यांच्या जवळ आलेल्या भाजपा आमदारांना ताकीद दिली होती मात्र त्यांनी माईक हुसकावण्याचा, राजदंड पळवण्याचा प्रयत्न सभागृहात केला. नंतर दालनात भाजपा आमदार तावातावाने बोलत आई-बहिणीवरून शिव्या दिल्या असल्याची माहिती सभागृहात दिली आहे. यावेळी विरोधी पक्षनेत्यांना त्यांना आवरण्याचे आवाहनही झिडकारल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितले.

त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Presiding Officer Bhaskar Jadhav) यांच्यासोबत दालनात देखील हुज्जत घालत शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गिरिश महाजन, आशिष शेलार यांच्यासह 12 भाजपा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत झालेल्या या गैरवर्तनाचा सत्ताधारी पक्षांकडून निषेध करण्यात आला आहे. तर संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी या गोष्टीची दखल घेत भाजपा आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव पटलावर ठेवत वर्षभरासाठी निलंबन केलं आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 5, 2021, 9:33 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *