Breaking News

पीएम किसान योजनेचा 8 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ; यादीत नाव असे पाहा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 14, 2021 3:47 pm
|

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 8व्या हप्त्याचे वितरण सुरू केले. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आज देशभरातील 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही खासदार या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना ईद आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या. पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये अंतरिम बजेटमध्ये जाहीर करण्यात आली. ही योजना डिसेंबर 2018 पासून अंमलात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आठव्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित करताना देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील शेतकरी अरविंद निषाद यांच्याशी पंतप्रधान मोदींनी संभाषण केले. अरविंद हा नमामि गंगे प्रकल्पाशी संबंधित आहेत. अंदमान निकोबार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, मेघालय यासह अनेक राज्यांतील शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये देते. ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. दर 4 महिन्यांनी ही सन्मान रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.16 लाख कोटी वितरित करण्यात आलेले आहेत. यापूर्वी 25 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 9 कोटी शेतकर्‍यांना 7 वा हप्ता हस्तांतरित करण्यात आला होता.

पीएम किसान निधीचा तपशील

एकूण शेतकऱ्यांची नोंदणी – 11.80 कोटी

एकूण लाभार्थी कुटुंबे – 10.82 कोटी

आतापर्यंत वाटप – 1.16 लाख कोटी रुपये

आपल्याला रक्कम मिळाली की नाही, असे करा चेक

रक्कम खात्यात मिळाली की नाही हे तुम्हाला बँकेच्या एसएमएसद्वारेही कळू शकते. याशिवाय https://pmkisan.gov.in/beneficiarystatus.aspx या वेबसाइटवर जाऊन आपला आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक टाकूनही निधीची स्थिती तपासता येते.

यादीत नाव कसे तपासाल?

सर्वात आधी https://pmkisan.gov.in वरजा.
वेबसाइवर मुख्य मेन्यूतील Farmers Corner वर क्लिक करा.
येथे लाभार्थींची यादीवर क्लिक करा.
यानंतर आपले राज्य, जिल्हा, गाव इत्यादी माहिती नोंदवा.
यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवर क्लिक करावे लागेल.
यानंतर आलेल्या यादीत तुम्ही आपले नाव चेक करू शकता.

तक्रार कशी नोंदवाल?

https://pmkisan.gov.in/NewHome3.aspx# नवीन शेतकरी या लिंकला भेट देऊन नोंदणी तपासू शकतात. आधार रेकॉर्ड अद्ययावत केले जाऊ शकतात. लाभार्थी शेतकरी त्यांची स्थिती तपासू शकतात. आपण आपले नाव सुरक्षित यादीमध्ये तपासू शकता. किसान क्रेडिट कार्ड फॉर्म सादर केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त आपण पंतप्रधान किसान निधी योजनेच्या 011-24300606 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता. या नंबरवर रकमेबाबत तुम्ही तपशील विचारू शकता किंवा तुमची तक्रार नोंदवू शकता.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 14, 2021, 3:47 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *