बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक – भाजप उमेदवार मंगला अंगडी आघाडीवर
बेळगाव : बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. बेळगावच्या आर पी डी कॉलेजमध्ये मतमोजणी सुरू आहे. तिथेच मतदान यंत्रे कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आलेली होती. भाजपच्या मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि समितीचे शुभम शेळके हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आहेत. खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते. १८ लाख १३ हजार ५६७ पैकी १० लाख ८ हजार ६०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे .
केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांचे शुभम शेळके मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली.
दरम्यान, सुरुवात पासूनच मतमोजणीत देखील आघाडी पिछाडी सुरू होती .सुरुवातीला काही काळ काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आघाडीवर होते ही आघाडी काही काळ जारकीहोळी यांनी टिकवली पण भाजपच्या मंगला अंगडी यांनी अडीच हजार मतांची आघाडी घेतली .एकूण 84 पैकी 26 राऊंड मतमोजणी पूर्ण झाले असून दुपारी 12:05 पर्यन्त -मंगला अंगडी भाजप 13 हजार मतांनी पुढे तर शुभम शेळके यांना 39 हजार मते पडली आहे
त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असेही पाहिले जाते. याशिवाय काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांच्यासह 10 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंगला अंगडी जवळपास 13 हजार मतांनी आघाडीवर,
सतीश जारकीहोळी : 138194
मंगला अंगडी : 151472
शुभम शेळके : 39992
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 2, 2021, 12:18 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY