Breaking News

अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार;बार्ज P305 जहाजावरील तब्बल २२ जणांचे मृतदेह हाती ; ५३ बेपत्ता

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 19, 2021 7:13 pm
|

मुंबई: चक्रीवादळ तौक्ते गुजरातमध्ये जाऊन शांत झाले आहे. पण, यापूर्वी मुंबईकडून जाताना १७ मे रोजी मुंबईजवळील अरबी समुद्रात तोक्तेनं थैमान घातलं. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे समुद्रात 4 जहाज अडकले. यामधून एक जहार बार्ज P-305 आता बुडाले आहे. यामध्ये 273 लोक होते. नौदलाने सांगितले की, INS कोच्ची 188 लोकांना रेस्क्यू करुन परतले आहे. आतापर्यंत नौदलाच्या हाती २२ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अद्यापही ५३ जण बेपत्ता असून सध्या नौदलाकडून त्यांचा शोध सुरु आहे. नौदलाच्या वेगवेगळ्या तुकड्या या शोध मोहिमांसाठी कार्यरत आहेत.

बार्ज P-305 व्यतिरिक्त गाल कंस्ट्रक्टर वर 137 लोक होते. या सर्वांना रेस्क्यू करण्यात आले आहे. बार्ज SS-3 वर 202 आणि सागर भूषणवर 101 लोक अडकले आहेत. नौदलानुसार, हे सर्व लोक सुरक्षित आहेत आणि यांना जेवण-पाणी सारख्या गोष्टी पुरवल्या जात आहेत. या जहाजांना ONCG मदतीने ओढून परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची (INS Kochi) आणि आयएनएस कोलकाता (INS Kolkata) या युद्धनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या (Ahilya) आणि ओशन एनर्जी (Ocean Energy) या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. याशिवाय, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी GAL Constructor बार्जवर अडकलेल्या १३४ कर्मचाऱ्यांचीही सहीसलामत सुटका केली.INS कोचीवरुन १२५ जणांना समुद्र किनारी आणण्यात आले. तर ६५ जणांना इतर जहाजांद्वारे आणलं जात आहे. अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन अद्यापही सुरुच आहे. बार्ज पी – 305 वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. एक रात्र आणि एक दिवस पाण्यात राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यातही तटरक्षक दलाला यश मिळालं.“बार्ज बुडत होते, म्हणून मला समुद्रात उडी मारावी लागली. मी ११ तास समुद्रात होतो. त्यानंतर नेव्हीने आम्हाला वाचवले” असे क्रू मेंबर अमित कुमार कुशवाहा यांनी सांगितले.

दरम्यान , पश्चिम नौसेना पथकाचे वाइस एडमिरल एम एस पवार म्हणाले की, आमची कंपनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ काम करते आहे. गेल्या पाच दशकातलं हे सर्वात मोठं चक्रीवादळ आम्ही पाहिलं आहे या चक्रीवादळात Pappa 305 अर्थात P 305 ही बार्ज बुडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 19, 2021, 7:13 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *