मोठी बातमी :लालूप्रसाद यादव यांचा तुरूंगातून बाहेर येणाचा मार्ग मोकळा, बार कौन्सिलच्या निर्णयाने मिळाला दिलासा
रांची: लालू प्रसाद यादव यांचा तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लालू यांच्यासह तुरुंगातील इतर लोकांनाही दिलासा मिळाला आहे. आता या लोकांना जामीनपत्र, इतर कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी न्यायालयात जाता येणार आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने बुधवारी हा आदेश जारी केला आहे. या आदेशाची प्रत सर्व राज्यांच्या बार कौन्सिललाकडे पाठविण्यात आली आहे.
झारखंड बार कौन्सिलला देखील हे आदेश प्राप्त झाले आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियाने म्हटले आहे की ,कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात असून अनेक राज्यांच्या बार कौन्सिलने वकिलांना कोर्टाच्या प्रक्रियेत भाग न घेण्याचे आदेश जारी केले आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना जामीन व जामीनपत्र, बाँड व इतर कागदपत्रे मिळाली आहेत त्यांचे काम पूर्ण होत नाही. जामीन मिळाल्यानंतरही कोणाला तुरूंगात ठेवणे हे त्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. अशा प्रकरणांमध्ये वकिलांना न्यायालयीन प्रक्रियेत सामील होण्यापासून रोखणे योग्य नाही. अशा लोकांना जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वकीलांना कोर्टात हजर राहण्याची परवानगी बार कौन्सिलने सर्व राज्यांच्या बार कौन्सिलला दिली आहे. बार कौन्सिलच्या या आदेशानंतर लालू प्रसाद यांच्यासह इतर लोकांना दिलासा मिळणार आहे. जामीनपत्रिका पूर्ण झाल्यानंतर सर्वांना तुरूंगातून बाहेर सोडण्यात येईल. लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयातून 17 एप्रिलला जामीन मिळाला होता, परंतु त्याची कोर्टाची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. आता त्याच्या बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 28, 2021, 10:49 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY