Breaking News

ट्विटरवर ट्रेंड होतोय “खेला होबे”, “नरेंद्र मोदी ग्लोबल पप्पू” आणि “दीदी ओ दीदी”टॉपवर

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 2, 2021 5:54 pm
|

कोलकाता – : आज पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला. यानंतर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या खेला करून दाखविला. त्यानंतर त्यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण करणारे ट्विटर ट्रेंड जोरात सुरु आहे . या ट्विटर ट्रेंडमध्ये “खेला होबे”, “नरेंद्र मोदी ग्लोबल पप्पू” आणि “दीदी ओ दीदी” टॉपवर आलेत. West bengal assemblyelections 2021 reactions, twitter trends snubs BJP

२०१४ पासून पप्पू हा शब्द जो वायनाडचे खासदार राहुल गांधींना चिकटला होता, तो आता नेटकऱ्यांनी मोदींना चिकटविण्याचा प्रयत्न केला आहे. यात नेटकऱ्यांनी फक्त ग्लोबल शब्द वाढविला आहे. कारण मोदी समर्थकांनी मोदींचे नेतृत्व जागतिक पातळीवरचे असल्याचा डंका सातत्याने पिटला आहे.

यामुळे हे सगळे शब्द बंगालच्या निवडणूकीत परवलीचे शब्द बनले होते. तेच शब्द आज नेटकऱ्य़ांनी ट्विटर हॅशटॅगमध्ये रूपांतर करून जोरदार चालविले आहेत. खेला होबे हे ममता बॅनर्जींचे उद्गार होते आणि त्यांनी ते खरे करून दाखविले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ममता बॅनर्जींना प्रत्येक जाहीर सभेत दीदी ओ दीदी म्हणून हाक मारल्यासारखे संबोधत होते. या दोन्ही परवलीच्या शब्दांचे हॅशटॅग ट्विटरवर टॉप १० मध्ये आहेत. या खेरीज टीएमसी २०० पार, नंदीग्राम आणि हावडा ब्रीज हे हॅशटॅगही जोरात चालू आहेत. ज्यातून भाजप समर्थकांना खिजविण्यात येते आहे. कारण २०० पार हा नारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपसाठी दिला होता. मुलाखतींमध्ये वारंवार त्यांनी तसा आत्मविश्वास व्यक्त केला होता. पण तो फेल गेल्यानंतर टीएमसी २०० पार हॅशटॅग चालवून सोशल मीडिया यूजर्सनी अमित शहांच्या दाव्याचीही खिल्ली उडविली आहे.

https://twitter.com/ImranQu39690215/status/1388790289704394753


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 2, 2021, 5:54 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *