पुण्यातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर MPSC परीक्षा, निकाल, नियुक्त्या याबाबत रोहित पवार यांचं ट्विट
पुणेः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळं आणि आर्थिक परिस्थितीमुळं स्वप्नील लोणकर या तरुणानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या तरुणाच्या आत्महत्येमुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . पुण्यातल्या फुरसुंगीमध्ये स्वप्निल आपले आईवडील आणि बहिणीसोबत राहत होता. शनिवार पेठेत स्वप्निलच्या वडिलांची प्रिटींग प्रेस आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील सुनील लोणकर (वय २४, रा. फुरसुंगी) याने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
स्वप्नील याच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आले. स्वप्नीलच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. स्वप्नीलच्या कुटुबीयांनी माध्यमांसमोर आक्रोश व्यक्त केला असून सरकारला जबाबदार धरलं आहे. रोहित पवारांनी एक ट्वीट केलं आहे. करोनामुळं स्थगित केलेली एमपीएससीची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2021
दरम्यान, स्वप्निल लोणकर या तरुणाने अवसरी खुर्द (ता, आंबेगाव) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी संपादन केली . अभ्यास आणि खेळाबरोबर स्वप्निलला सामाजिक कामाची चांगलीच आवड होती . विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्याला गौरविण्यात आले होते . सतत दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे हे स्वप्निलच्या ‘प्लेटलेट्स’ मध्येच आहे म्हणूनच आपल्या प्लेटलेट्स तो लोकांनां दान करत असतो. या तरुणाने मागील अडीच वर्षापासुन 20 वेळा रक्तातील प्लेटलेट्सचे दान करुन दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या अनेकांना जीवनदान देण्याचे महान कार्य केले . त्याचे हे काम समाजातील इतर तरुणांपुढे प्रेरणादायी बनले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 4, 2021, 3:49 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY