Breaking News

देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळताहेत; खडसेंची टीका

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 7, 2021 2:00 pm
|

मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली होती. फडणवीसांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले होते. मात्र ही राजकीय भेट नसल्याचे म्हणत एकनाथ खडसेंनी चर्चेला पूर्णविराम दिला होता. आता मात्र एकनाथ खडसे यांनी मोठे विधान करुन भाजपची चिंता वाढवली आहे.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यांची सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी कसलाही विचार न करता केवळ ‘मी सत्तेत आले पाहिजे’ (Government Formation) या विचाराने अजित पवार सत्ता स्थापन केली होती. आजही त्यांच्या मनात तीच तळमळ दिसते. ठाकरे सरकार पडण्याची कुठलीही शक्यता नसल्याने भाजपचे अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत. अशा परिस्थितीत, अजूनही सरकार स्थापन करण्यासाठी कोणताही पक्ष पुढे आला तरीही ते सरकार स्थापन करण्यासाठी तयार होतील, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असल्याचं चंद्रकांत पाटील आणि इतर नेते माध्यमांना सांगत आहेत. सरकार पडणार असल्याच्या चंद्रकांतदादांनी दोन तारखाही देऊन टाकल्या. फडणवीसांनी तारीखही निश्चित केली होती. पण काहीही होणार नसून, हे सरकार पडणार नाही. विरोधक वाटच बघत राहतील, असा टोला त्यांनी लगावला. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसेंदिवस अधिकच मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आमचं सरकार येणार आहे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचं आमदारांना सांगून दिवस काढत आहेत. मात्र लवकरच राजकीय भूकंप होणार आहे. अनेक आमदार पक्षांतर करणार आहेत, असा दावाही त्यांनी केला.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 7, 2021, 2:00 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *