केवळ प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं; अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार किरण खेर यांचे पती अनुपम खेर हे मोदी सरकारचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.. ते अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांचे कौतुक करतात, पण यावेळी अनुपम खेर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनाच्या संकटकाळात सरकार कुठे न कुठे कमी पडले असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे हे महत्वाचे असल्याची टीका अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे मत अभिनेता अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे. मोदी सरकारवर अनुपम खेर यांनी केलेल्या या टीकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचेही दिसून आले आहे.
सरकारची प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न आणि काही नद्यांमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांचे प्रेत दिसत असल्यासंबंधी एक प्रश्न अनुपम खेर यांना विचारण्यात आला होता. त्यावर अनुपम खेर म्हणाले की, सरकारवर या प्रकरणात जी टीका होते आहे, ती योग्य असून या परिस्थितीत सरकारने ते काम करावे ज्यासाठी त्यांना निवडून दिले आहे.
आज जी काही परिस्थिती देशात निर्माण झाली आहे, त्यामुळे कोणालाही वेदना होऊ शकतात. देशातील नद्यांमध्ये तरंगणारी प्रेते यावरुन कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करण्याची ही वेळ नाही. देशातील एक जबाबदार नागरिक या नात्याने आपण सरकारला जाब विचारला पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 13, 2021, 3:46 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY