Breaking News

जव्हार शहरातील बँकासमोर अँटीजन तपासणी केंद्र सुरू

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 14, 2021 6:38 pm
|

पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार सारख्या दुर्गम भागात सद्यस्थितीत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असला तरी खावटी योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य सुरु असल्याने बँकामध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. ही ठिकाणे भविष्यात कोरोना प्रसाराची ठिकाणे होउ नयेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे यांच्या उपस्थितीत जव्हार शहरातील बँकासमोर आरोग्य विभागामार्फत अँटीजन तपासणी केंद्र सुरू करण्यात आली.

जव्हार शहारातील स्टेट बँक ऑफ इंडिया, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या प्रवेशव्दारावर ही अँटीजन तपासणी केंद्र सुरु करण्यात आली असुन, तपासणी शिवाय बँक ग्राहकांना बँकेत प्रवेश देऊ नये अशा सुचना उपविभागीय अधिकारी संदीप पवार यांनी दिलेल्या आहेत.

अशा स्वरुपाची कोरोंना तपासणी केंद्र उभारल्यामुळे जव्हार सारख्या ग्रामीण भाग कोरोनाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी चांगली मदत होईल अशी माहिती तहसिलदार संतोष शिंदे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 14, 2021, 6:38 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *