Breaking News

महाराष्ट्रामध्ये नव्या निर्बंधांची घोषणा; आज रात्री ८ पासून कडक नवे नियम

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 22, 2021 1:30 pm
|

मुंबई :महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभुमीवर सरकारने 1 मे 2021 पर्यंत काही निर्बंध लागू कलेले आहेत. गेले दोन दिवस राज्यात पूर्णतः लॉकडाऊन होणार अशी चर्चा होती. मात्र आता सरकारने लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारण्याऐवजी अजून कडक निर्बंध लागू केले आहेत. काल याबाबत मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या. हे निर्बंध आज रात्री 8 वाजल्यापासून 1 मे 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील.यामध्ये कोरोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांची कार्यालये वगळता, सर्व सरकारी कार्यालये आता 15 टक्के कार्यक्षमतेने सुरु राहतील. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय आणि तसेच ठराविक वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याशिवाय घराबाहेर पडता येणार नाही आहे. (updated lockdown rules)

किराणा, दूध, फळे, अंडी, मटण, भाजीपाला (जीवनावश्यक वस्तू) याविषयी नवीन नियमात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नसल्याने सकाळी ७ ते ११ दरम्यान ही विक्री आणि खरेदी करता येणार आहे.

खाजगी बसेस 50 टक्के क्षमतेसह धावू शकतात. यावेळी, कोणताही प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाही. ही बस एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात आणि एका शहरातून दुसर्‍या शहरात धावणार नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. जर कोणी हा नियम पाळत नसल्याचे आढळले तर त्याला 10.000 दंड आकारला जाईल.

लग्नात २५ पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असेल तर ५० हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. याआधी हा दंड फक्त १० हजार होता, त्यामुळे १० हजार रुपयात सुटका होत होती, पण आता ५० हजार आणि कारवाईचा देखील सामना करावा लागणार आहे.

जर इंटरसिटी किंवा इंटर डिस्ट्रिक्ट प्रवास करायचा असेल तर 14 दिवस विलगीकरणामध्ये राहावे लागेल.

लोकल ट्रेन, मोनो आणि मेट्रोचा उपयोग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक अधिकारी तसेच डॉक्टर आणि आवश्यक सेवांशी संबंधित लोकच करू शकतात.

राज्य सरकार व स्थानिक प्राधिकरणाच्या बसेस फक्त 50 टक्के क्षमतेसह चालविल्या जाऊ शकतात, ज्यामध्ये कोणताही प्रवासी उभा राहणार नाही.

लोकल ट्रेनचा उपयोग वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी देखील केला जाऊ शकतो, ज्या व्यक्तीस मेडिकल इमरजंसी आहे त्यासोबत असणाऱ्या व्यक्तीलाही लोकलमधून प्रवासाची मुभा आहे.

दरम्यान, राज्यात आज 67,468 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 54,985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 32,68,449 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6,95,747 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15% झाले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 22, 2021, 1:30 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *